सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे वृक्षारोपणाने ‘कृषि दिन’ साजरा

रत्नागिरी दि. ३ : आपल्या देशामध्ये हरितक्रांती सन १९६० च्या दशकामध्ये झाली. देशाची ५२% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. महाराष्ट्र मध्ये हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री कै. श्री. वसंतराव नाईक यांची जयंती निमित्त दरवर्षी १ जुलै रोजी ‘महाराष्ट्र कृषी दिन’ साजरा करण्यात येतो. डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी अंतर्गत झाडगाव, रत्नागिरी येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र’ येथे दिनांक १ जुलै २०२६ रोजी ‘कै. श्री. वसंतराव नाईक’ यांची जयंती साजरी करण्यात आली.
संशोधन केंद्र प्रमुख, डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांनी ‘वसंतराव नाईक’ यांच्या प्रतिमेस पुष्पहार प्रदान केला . सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी अभिवादन केले. यावेळी डॉ. केतन चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वसंतराव नाईक हे केवळ एक राजकारणी नव्हते, तर ते एक द्रष्टे नेते होते. त्यांनी महाराष्ट्राच्या मातीला आणि शेतकऱ्यांच्या हाताला ओळख दिली. त्यांनी मांडलेले “शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे” हे केवळ वाक्य नव्हते, तर त्यांच्या धोरणांचा तो केंद्रबिंदू होता. आज कृषी दिन साजरा करताना आपल्याला हेही समजून घ्यावे लागेल की, बदलत्या काळानुसार शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज आहे. हवामान बदल, वाढती लोकसंख्या आणि बाजारपेठेतील आव्हाने यांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला आधुनिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती आणि मूल्यवर्धित उत्पादने यांकडे वळणे आवश्यक आहे.
आजच्या या दिनी, आपण सर्वांनी एक शपथ घेऊया की, ज्या ध्येयाने वसंतराव नाईक यांनी शेती आणि शेतकऱ्यांची सेवा केली, त्याच भावनेने आपणही शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करूया आणि महाराष्ट्राला कृषी क्षेत्रात अधिक समृद्ध करूया.त्यानंतर शासन निर्देशानुसार ‘कृषि सप्ताह’ निमित्त विशेष ‘वृक्षारोपण’ मोहीम राबविण्यात आली.
सदर ‘कृषि सप्ताह’ दिनांक १ ते ७ जुलै रोजी साजरा करण्यात येणार आहे. ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र’ झाडगाव तसेच पेठ्किल्ला येथील प्रक्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात आले.
इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिड टाउन या सेवाभावी संस्थेसोबत संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला . इनरव्हील क्लबने सर्व वृक्षरोपे प्रायोजित केली. श्रीमती ऋचा गांधी, श्रीमती सुवर्णा चौधरी, डॉ प्रियंका कांबळे, श्रद्धा सावंत, प्रज्ञा गांधी, आशा सनगर आणि सोनाली आयरे उपस्थित होत्या. त्यांनी वृक्षारोपण कार्यक्रम मध्ये सहभाग नोंदविला.
सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. अतुल मोहोड आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता डॉ. आसिफ पागारकर (सहयोगी संशोधन अधिकारी व प्राध्यापक) यांनी समन्वयाचे काम पाहिले तर डॉ. मनोज घुघुसकर (सहाय्यक संशोधन अधिकारी), डॉ. हरिष धमगये (अभिरक्षक), प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम (सहाय्यक संशोधन अधिकारी), श्रीम. व्ही. आर. सदावर्ते व श्रीम. ए. एन. सावंत (वरिष्ठ संशोधन सहाय्यक) सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाकरिता, श्री. मनिश शिंदे, श्री. सचिन पावसकर, श्री. सचिन चव्हाण, श्री. तेजस जोशी, श्री. योगेश पिलणकर, श्री. प्रशांत पिलणकर, श्री. स्वप्नील आलीम, श्री. पेडणेकर श्री. केतन चव्हाण व श्री. अभिजित मयेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.



