कोकणवासी-नागपूरकरांसाठी ४ विशेष साप्ताहिक ट्रेन सुटणार

मुंबई दि. २७ :- उन्हाळी सुट्ट्या संपून शाळा सुरू झाल्या तरी प्रवाशांची गर्दी कमी होताना दिसत नाही. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर मान्सून आल्याने पर्यटकांनी पावसाळी सहलींचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यात कोकणात जाणे हा एक अविस्मरणीय अनुभव मानला जातो. निसर्गाचे सजलेले रुप पाहण्यासाठी पर्यटक एकच गर्दी करत असतात. याच अनुषंगाने मध्य रेल्वेने गोव्याला जाण्यासाठी विशेष साप्ताहिक ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन, मध्य रेल्वे मुंबई ते करमळी आणि नागपूर दरम्यान ४ विशेष साप्ताहिक गाड्या चालविण्यात येणार आहे. या विशेष ट्रेनचे आरक्षण सर्व पीआरएस केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सामान्य दरांसह अनारक्षित डब्यांचे बुकिंग यूटीएस प्रणालीद्वारे करता येईल. प्रवासी तिकीट बुकिंगसाठी ‘RailOne’ ॲप देखील डाउनलोड करू शकतात. या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीइएस ॲप डाउनलोड करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर विशेष ट्रेन
ट्रेन क्रमांक ०१०२१ विशेष साप्ताहिक गाडी दिनांक २७.०६.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.४५ वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०१०२२ विशेष साप्ताहिक गाडी दिनांक २७.०६.२०२६ रोजी नागपूर येथून २१.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३.५० वाजता पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
संरचना: १ प्रथम वातानुकूलित सह वातानुकूलित द्वितीय, १ वातानुकूलित वातानुकूलित द्वितीय सह वातानुकूलित तृतीय, १४ शयनयान, २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमळी विशेष सेवा
ट्रेन क्रमांक ०११२९ विशेष साप्ताहिक विशेष सेवा दिनांक २६.०६.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता सुटेल आणि करमळी येथे त्याच दिवशी १४.४० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०११३० विशेष साप्ताहिक गाडी दिनांक २८.०६.२०२६ रोजी करमळी येथून १६.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०५.२५ वाजता पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.
संरचना: १ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.



