रत्नागिरी

रत्नागिरीत लवेकर मोटर्सच्या नव्या LCV शोरूमचे उत्साहात उद्घाटन

रत्नागिरी दि. २५ : येथील जेके फाईल्स समोर महानगर गॅस शेजारी अशोक लेलँडच्या लाइट कमर्शियल व्हेईकल (LCV) विभागाच्या ‘लवेकर मोटर्स’ या नव्या शोरूमचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

शोरूमचे उद्घाटन अशोक लेलँडचे बिझनेस हेड श्री. विप्लव शहा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी अशोक लेलँडचे झोनल मॅनेजर अतुलजी क्षीरसागर, रिजनल मॅनेजर गौरव ठाकरे, गरिया सेल मॅनेजर अभिषेक नाडकर्णी, सुनील पाटील, अखिलेश चोपडे आदी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते अशोक लेलँड च्या समाधानी ग्राहकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आरटीओचे अधिकारी शेखर लवेकर,  प्रकाश मयेकर, सचीन शिंदे, दैवज्ञ पतपेढीचे विजय पेडणेकर, संतोष भुर्के, प्रमोद खेडेकर करसल्लागार उज्ज्वल बापट, वरुण फडके, बॅक ऑफ बडोदाचे मॅनेजर सुधाकर गोन्नाडे, प्रदीप गायकवाड, विविध फायनान्स, इन्शुरन्स कंपन्यांचे व बँकांचे अधिकारी, उदयोग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लवेकर मोटर्सचे संचालक संदीप लवेकर, श्रेयस लवेकर, कुणाल लवेकर, रश्मी लवेकर, राजेश्वरी पातकर आणि अनुरूप पातकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने १५ ग्राहकांना नव्या वाहनांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला. उपस्थितांनी लवेकर मोटर्सच्या या नव्या उपक्रमास शुभेच्छा देत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button