रत्नागिरी
विश्व हिंदू परिषदेचे जेष्ठ कार्यकर्ते अप्पा शेंबेकर यांचे निधन

बुरंबी दि. १२ :- विश्व हिंदू परिषदेचे जेष्ठ कार्यकर्ते व देवरुख येथील राम मंदीरचे विश्वस्त वसंत तथा अप्पा शेंबेकर यांचे वृद्धापकाळाने आज पहाटे चार वाजता रत्नागिरी येथे निधन झाले. ते ९३ वर्षाचे होते.
त्यांनी देहदान केले असल्याने मृतदेह डेरवण येथील रुग्णालयात सुपुर्त करण्यात आला. त्याचे पश्चात तीन मुली, जावई, नातवंडे असा परीवार आहे. रत्नागिरी भाजपच्या माजी जिल्हा अध्यक्ष सौ. रश्मी सप्रे यांचे ते पिताश्री होते.



