रत्नागिरी

कोकणातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी: जिल्हा बँक संचालकांची मागणी

देवरुख दि. १२ (सुरेश सप्रे) :- शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीत कोकणातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा कोणताचा लाभ मिळणार नसल्याने अशा कर्जदारांना सरसकट कर्जमाफी मिळावी अशी मागणी आज झालेल्या बैठकीत मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक सौ. नेहा माने यांनी केली आहे.

या योजनेतील त्रुटी असल्याने आज तालुक्यातील विविध कार्यकारी संस्थांचे अध्यक्ष. उपाध्यक्ष. व सचीवव मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात कोकणातील शेतकऱ्यांना मिळणारी कर्जमाफी यावर चर्चा करण्यात आली.

त्यात काही शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही त्याचे मुद्दे खालील प्रमाणे:-

१. ज्या शेतकऱ्यांने दि. ०१.०४.२०१९ ते दि.३१.०३.२०२५ उचल केली परंतु ज्यांनी व जे शेतकरी दि.३१.०३.२०२५ ला थकबाकी होते. अशा शेतकऱ्यांनी दि. ०१.०४.२०२५ ते दि.३१.०३.२०२६ या कालावधीत आपल्या कर्जाची पूर्णफेड केली व पूर्णफेड करुन संस्था अगर बँक एन.पी.ए. मध्ये जावू नये म्हणून संस्थेला व बँकेला सहकार्य केले अशा सर्व शेतकऱ्यांना या कर्जमुक्ती योजनेचा कोणताचा लाभ मिळणार नाही. अशा कर्जदारांना सरसकट कर्जमाफी मिळावी.

२. सन २०२२-२३, सन २०२३ २४ व सन २०२४- २५ या तिन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही २ आर्थिक वर्षात नियमित असणाऱ्या सभासदाला लाभ मिळणार आहे. परंतु ज्याने या तिन वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षात कर्जाची उचल करुन ज्याने मुदतीत कर्जाची पूर्णफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळणार नाही.

३.यापूर्वी महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ व महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या कर्जमाफी योजनेतील पात्र सभासदांना आजपर्यंत सुमारे १५ – २०% शेतकऱ्यांना कर्जमाफी व प्रोत्साहनपर रक्कमेचा देखील लाभ मिळालेला नाही.

४.दि.०१.०४.२००७ ते दि. ३१.०३.२००९ या कालावधीत कर्ज घेतलेले शेतकऱ्यांची आज तगायात शासनाने कर्जमाफी न केल्यामुळे असे सर्व शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत.

५. ज्या शेतकऱ्यांना महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ चा लाभ घेतलेला आहे. अशा शेतकऱ्यांना नव्या थकबाकीसाठी फक्त रु.५०,०००/- पर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तो त्याला रक्कम रु.२.०० लाख पर्यंत मिळावा.

६. सन २०१९-२०२०, सन २०२० २१ व सन २०२१-२२ या कालावधीत ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी कर्ज घेवून मुदतीत कर्ज पूर्णफेड केले आहे. असे सर्व शेतकरी प्रोत्साहनपर योजनेतुन वंचित रहात आहेत.

७. दि.०१.०४.२०१९ ते दि. ३१.०३.२०२५ पर्यंत ज्या शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले त्या कालावधीत फार्मर आय डी घेणे हा नियम नव्हता. त्यामुळे कर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्तीचा फार्मर आय डी ग्राह्य धरण्यात यावा. वरील मुद्यांचा सहानभुतीपूर्वक विचार व्हावा व सर्व लाभार्थी शेतकरी यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा अशी एकमुखी मागणी या बैठकीत करण्यात आली. व तसे निवेदन मुख्यमंत्री व. सहकारमंत्री यांना देण्यात येणार आहे. या

या बैठकीला संचालक सौ. नेहा. माने.राजेंद्र सुर्वे. यांचेसह तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी व मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button