रत्नागिरी

गुंतागुंतीची स्टोमा आणि हेमीआर्थ्रोप्लास्टी (खुबा बदलणे) शस्त्रक्रिया एकाच वेळी करण्यात यश

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय रत्नागिरीची यशस्वी कामगिरी

रत्नागिरी दि. १२ :- तालुक्यातील परटवणे येथे राहणाऱ्या श्रीम. आनंदी गंगाराम चव्हाण. वय – ८५ वर्षे, यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथे एकाचवेळी गुंतागुंतीची अशी स्टोमा शस्त्रक्रिया आणि हेमीआर्थ्रोप्लास्टी( खुबा बदलणे ) यशस्वीरित्या करण्यात आली.

सदर शस्त्रक्रिया ही दुर्मिळात दुर्मिळ अशा प्रकारची होती कारण या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णास जोखीम जास्त असते. सदर रुग्ण दिनांक १२ मे २०२६ पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथे खुबा बदलणे आणि Rectal Prolapse या आजारावर उपचार घेण्यासाठी दाखल झाल्या होत्या. सदर रुग्ण यांची यापूर्वी संडास ची जागा वारंवार बाहेर येणे Rectal Prolapse शस्त्रक्रिया झाली होती तसेच त्यांचा डावा खुबा फ्रॅक्चर झाला होता शिवाय ब्लड प्रेशर चा देखील त्रास होता. अशा गंभीर परिस्थितीत दोन्ही शस्त्रक्रिया एकाच वेळी करणे ही डॉक्टरांच्या कौशल्याची परीक्षाच ठरणार होती. सदर शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाला पूर्ण भूल देणे अपेक्षित असते मात्र सदर रुग्णाची कार्डियाक कंडिशन चांगली नसल्यामुळे कमरेखालील भागा पुरतेच भूल देण्यात आली होती.

सदर रुग्ण शस्त्रक्रियेसाठी खाजगी रुग्णालयांमध्ये देखील गेल्या होत्या मात्र शस्त्रक्रिया जोखीमची असल्याने त्यांना नकार देण्यात आला त्यानंतर सदर रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या व काही आठवड्याच्या उपचारानंतर दिनांक १९ मे २०२६ रोजी श्रीम. आनंदी चव्हाण यांची शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर, डॉ. जिज्ञासा भाटे ( शल्यचिकित्सकशास्त्र विभाग प्रमुख ), डॉ.निखिल देवकर (अस्थिव्यंगपचारशास्त्र विभाग प्रमुख), डॉ.जामशेर (भुलतज्ञ ) , डॉ. प्रियांका यांच्या पथकाने केली, त्यांना या शस्त्रक्रियेसाठी OT स्टाफ यांनी सहकार्य केले. श्रीम.आनंदी गंगाराम चव्हाण यांची प्रकृती आता चांगली असून त्यांना १० जून २०२६ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी येथून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button