१७ मे रोजी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत “लुंबिनी बुद्धविहार गडनरळ”चा तिसरा वर्धापन दिन संपन्न होणार

विल्ये दि. १६ :- रत्नागिरीतील गडनरळ बौद्धजन ग्रामस्थ मंडळ व बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक – ७ गडनरळ रत्नागिरी यांच्या विद्यमाने रत्नागिरी १७ मे रोजी “लुंबिनी बुद्ध विहार” गडनरळ चा तिसरा वर्धापन दिन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर व कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाच्या नियोजनाप्रमाणे सकाळी ९ वाजता धम्म ध्वजारोहण, ९:३० वा. बुद्ध पूजा पाठ,दुपारी १ वा.वाजता स्नेहभोजन, ३ वा.विविध स्पर्धा व फनी गेम, रात्री ७:३० वा. प्रमुख मार्गदर्शक आनंदराज आंबेडकर आणि लक्ष्मण भगत यांच्या उपस्थितीत जाहीर सभा संपन्न होईल. तसेच सभेनंतर रात्री ठीक १० वा. रेकॉर्ड डान्स सादर होणार आहेत. या कार्यक्रमास मा.प्रकाश पवार (ता. अध्यक्ष ), विजय आयरे (ता. उपाध्यक्ष ), सुहास कांबळे (ता. सचिव), शशिकांत कांबळे (ता. महासचिव), मंगेश सावंत (ता. कोषाध्यक्ष), दिया कांबळे (ता. महिला सचिव),रविकांत पवार (सचिव, संस्कार समिती ),उषा सावंत (जि.पं.सदस्य वाटद ), प्रितम आयरे (अध्यक्ष भिम युवा पॅन्थर) ऋतुजा आंबुलकर (ता.महिला अध्यक्ष ),तसेच मान्यवर कार्यकर्ते, सदस्य उपस्थित राहणार आहेत.
दुसऱ्या दिवशी ता. १८ मे रोजी सकाळी ९ वा. बुद्ध पूजा पाठ,१० वा. मार्गदर्शक संतोष आयरे यांचे धम्म प्रवचन, दुपारी १२:३० ला स्नेह भोजन, रात्री ७ वा. मुलांचे विविध विशेष गुणगौरव कार्यक्रम,
रात्री ८ वा.मान्यवरांचे मनोगत, रात्री १० वा. यशवंत मानके लिखित हृदयस्पर्शी दोन अंकी नाटक बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक – ७ व महिला मंडळ निर्मित “निर्दयी “या नाट्य प्रयोगाचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रम आयोजकांनी केले आहे.


