रयतराज शिक्षण संस्थेचे म.गांधी विद्यालय व बाबासाहेब कोलते ज्युनिअर कॉलेज साखरपा भाग शाळा किरबेटचा १० वी निकाल ९८.३%

विल्ये दि. १३ :- संगमेश्वर तालुक्यातील रयतराज शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय व बाबासाहेब कोलते ज्युनियर कॉलेज साखरपा भाग शाळा किरबेट यांच्या एसएससी २०२६ बोर्ड परीक्षेचा ९८.०३% निकाल लागल्याने शाळेचे आणि यशस्वी विद्यार्थीवर्गाचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
या निकालात प्रथम तीन क्रमांकामध्ये कु. सानिका अरविंद माईल ८८% मिळवून प्रथम आली तर द्वितीय क्रमांक श्रेयस मंगेश जाधव याने ८५.४०% आणि तृतीय क्रमांक कु. वेदांक्षी रविंद्र नवाले हिने ८३.४०% प्राप्त करून यश संपादक केले. शाळेच्या यशस्वी निकालाबाबत स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, सर्व पालक वर्ग, माजी विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक श्री.व्ही.डी.बाईंग, तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.


