रत्नागिरी

पैसा फंड इंग्लिश स्कूलचा निकाल ९५:८९ टक्के; आरोही सावंत प्रथम

संगमेश्वर दि. ८ ( प्रतिनिधी ):- व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरचा दहावीचा निकाल ९५:८९ टक्के लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे मुख्याध्यापक सचिन देव खामकर पर्यवेक्षक प्रकाश दळवी यांनी अभिनंदन केले आहे.

इयत्ता दहावीत प्रथम क्रमांक आरोही दिनेश सावंत – ८८.६०, द्वितीय क्रमांक शिवम सुरेश गुरव – ८५.४०, तृतीय क्रमांक मृणाली उदय लिंगायत – ७९:४०, चतुर्थ क्रमांक रुग्वेद प्रविण विभुते ७९, पाचवा क्रमांक अन्वेश अंकुश गुरव – ७७:४० टक्के व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय संगमेश्वर येथे सर्व वर्गासह अकरावीच्या तीनही शाखात नवीन प्रवेश देण्याचे काम दररोज सुरू असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक सचिन देव खामकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button