रत्नागिरी

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत सावर्डे येथे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या एकास अटक

रत्नागिरी दि. २० :- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत सावर्डे येथे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या एकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ₹70,900/- किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र बाळगणे, वाहतूक व वापर यांना प्रतिबंध घालण्यासाठी व कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने  जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस आवश्यक सूचना दिलेल्या आहेत.

त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक हे दिनांक 18/03/2026 रोजी सावर्डे पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमी प्राप्त झाली की मौजे आगवे ता. चिपळूण येथे महेश जाधव नावाचा इसम हा आपले घराचे मागील बाजूस अवैद्य दारु विक्रीचा व्यवसाय करतो.

प्राप्त माहितीच्या आधारे या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचून पाहणी केली असता, घराच्या मागील बाजूस असलेल्या गुरांच्या गोठ्या जवळील लाकडी खोपटीत एक इसम बंदुकीची साफसफाई करताना आढळून आला. या इसमास तात्काळ ताब्यात घेऊन पंचांसमक्ष चौकशी केली असता त्याने आपले नाव महेश महेंद्र जाधव, वय 35 वर्षे, रा. आगवे बौद्धवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी असे सांगीतले व पाहिणी दरम्यान त्याच्याकडे असलेली बंदूक ही सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक असल्याचे निदर्शनास आले.

सदर इसमास शस्त्र बाळगण्याबाबत परवाना विचारला असता त्याने त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगीतले. या पथकामार्फत पुढील तपासणी दरम्यान त्या ठिकाणी 1) एक सिंगल बॅरल कडतुमची बंदूक, 2) एक जुनी नादुरुस्त ठासणीची बंदूक 3) 9 जिवंत काडतुसे, असा एकूण ₹70,900/- किमतीचा मुद्देमाल मिळून आला.

सर्व साहित्य पंचासमक्ष जप्त करण्यात आले व आरोपीत महेश महेंद्र जाधव, वय 35 वर्षे, रा. आगवे बौद्धवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी याला ताब्यात घेण्यात आले व त्याच्या विरुद्ध सावर्डे पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 24/2026 शस्त्र अधिनियम, 1959 चे कलम 3(1), 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सावर्डे पोलीस ठाणे करीत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे व पो.हवा/909 विजय आंबेकर, पो.हवा/1407 दिपराज पाटील, पो.हवा / 262 विवेक रसाळ, चा.पोशी/215 अतुल कांबळे या पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button