रत्नागिरी

रत्नागिरीत २४ मार्चला ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

रत्नागिरी, दि. १८ :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा मंगळवार दिनांक २४ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित केला आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा मेळावा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाचणे रोड येथे पार पडेल.

नोंदणी अनिवार्य

या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीकृत उमेदवारांनी आपले प्रोफाईल अद्ययावत ठेवावे. ज्या उमेदवारांनी आधीच नोंदणी केली आहे, त्यांनी आपल्या युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करून मेळाव्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी.

मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे

उमेदवारांनी मेळाव्याच्या दिवशी आपला अद्ययावत बायोडेटा (Biodata) आणि सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांची अद्याप नोंदणी झालेली नाही, त्यांनी तातडीने जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाशी संपर्क साधून आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन मोरेश्वर दुधाळ (प्रभारी सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button