Uncategorized

डेरवण रुग्णालयात चेहऱ्यावरील वेदना कमी करणारी शस्त्रक्रिया यशस्वी

सिंधुदुर्गच्या विजयवर मोफत शस्त्रक्रिया

संगमेश्वर दि. १६ ( प्रतिनिधी ) :- सिंधुदुर्ग जिल्यातील शिरवंडे मालवण येथील विजय पवार हा तरुण गेली दोन वर्षे चेहऱ्याची उजवी बाजू असह्य दुखणे आणि जबड्यामधून अचानक वेदना होत होत्या. त्याला हसताना, जेवताना, दात घासताना वेदना होत असल्याने त्रस्त झाला होता. विजयला दररोजची नित्य नियमित कामे सुद्धा करता येत नव्हती.

काही महिने अनेक उपचार घेऊनही त्रास कमी न झाल्यामुळे शेवटी तो वालावलकर रुग्णालयात न्यूरो सर्जन डॉ. मृदुल भटजीवाले यांना भेटला. त्यावेळी त्यांनी सुचवलेल्या एम.आर.आय. मध्ये मेंदूतून चेहऱ्याकडे आलेल्या एका शिरेवर दाब येत होता. ती शिरे मार्फत चेहऱ्याला संवेदना देण्याचे काम पाहिले जाते. हे महत्त्वपूर्ण काम करणारी शीर दबली गेल्यामुळे हसताना बोलताना विजयला एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत होते.

याला वैद्यकीय भाषेत ट्रायजेमिनल न्यूरॉलजिआ असे म्हणतात. याला उपाय एकच असतो तो म्हणजे मायक्रोव्हॅस्क्युलर डिकम्प्रेशन शस्त्रक्रिया होय. न्यूरोसर्जन डॉ. मृदुल भटजीवाले यांनी कानाच्या मागे एक छोटा छेद देऊन त्यातून दुर्बीण आत सरकवून वेदना निर्माण करणारी शीर शोधून काढली. त्यानंतर शीर आणि ज्या रक्तवाहिन्या दाब देत होत्या त्यामध्ये एक स्पॉंज सारखा टेफ्लॉन पॅच टाकला आणि शिरेवरीचा दाब कमी केला. ही शस्त्रक्रिया मेंदूतील शिरेची असल्याने बरीच गुंतागुंतीची होती. पण ती यशस्वीपणे पार पडल्याने लगेचच विजयच्या वेदना कमी झाल्या आणि तो पहिल्यादाच ना दुखता हसू आणि जेवू शकला. हेच ह्या शस्त्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे.

विशेष म्हणजे गेली दोन वर्षे ही वेदना शमविण्यासाठी अनेक औषधे विजयला घ्यावी लागली त्यात त्याचा रक्तदाबही वाढला होता. या सर्व तक्रारी काही मिनिटातच समूळ नष्ट झाल्या आणि ही शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेत पूर्णतः मोफत करण्यात आली.वालावलकर रुग्णालयात अतिशय उच्च प्रतीच्या, क्लिष्ट गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया नित्य सुरू असतात. त्यामुळे डेरवण रुग्णालय कोकणवासीयासाठी हे जणू एक वरदानच ठरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button