रत्नागिरी

कसबा येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे बलिदानदिना निमित्त संभाजी प्रेमींकडून वंदन!

जगातील सर्वोत्कृष्ट त्यागाचे प्रतीक असे स्मारक उभारावे : माजी आ. प्रमोद जठार

संगमेश्वर दि. ११ ( प्रतिनिधी ):- धर्मरक्षक छत्रपती संभाजी राजे समिती कसबा संगमेश्वरच्यावतीने कसबा येथे राजे संभाजी यांच्या बलिदान दिनानिमित्त संभाजी प्रेमी राजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले .

प्रति वर्षी कसबा संगमेश्वर येथे धर्मरक्षक छत्रपती संभाजी राजे धर्मरक्षण दिन समिती कसबा आणि भाजपाच्या वतीने बलिदान दिनानिमित्त महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात येते.

आज सकाळी साडे दहाच्या सुमारास छत्रपती संभाजी प्रेमी आणि धर्मरक्षण दिन समिती कसबा संगमेश्वरच्या वतीने भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमेवर अभिषेक, पुजा करणेत आली. भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या पूर्णाकृती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी छत्रपती संभाजी महाराज की जय , छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, वंदे मातरम आदी घोषणानी परिसर दणाणून गेला.

यानंतर समितीच्या वतीने आणि छत्रपती संभाजी प्रेमी आणि ग्रामस्थ यांनी महाआरती केली.यावेळी संभाजी प्रेमिना संबोधित करताना माजी आम. प्रमोद जठार यांनी राज्य शासनाचे आभार मानून कसबा या ठिकाणी छत्रपती संभाजी राजे यांचे स्मारक हे गुजरात येथील वीर सावरकर यांच्या स्मारकच्या तोडीस तोड असे जगातील सर्वोत्कृष्ट त्यागाचे प्रतीक असे स्मारक उभारावे अशी मागणी शासनाकडे केली आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या स्मारका साठी ३०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याचे जाहिर केले.

प्रथम दर्शनी हे स्मारक पाच एकरमध्ये होणार असले तरी, हे स्मारक भव्य दिव्य १०० एकर मध्ये व्हावे, अशी येथील प्रत्येक शंभू प्रेमींची इच्छा असल्याचे जठार यांनी सांगितले.यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव,शिवसेना नेते राजेंद्र महाडिक, सरचिटणीस डॉ.अमित ताठरे, तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, रुपेश कदम, शर्वरी वेल्ये , देवरुख नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, सतीश पटेल , योगेश शिर्के , पंचायत समिती सदस्य बावा जड्यार, सौ. कोमल रहाटे, सुशांत मुळये, सुधीर यशवंतराव युवा मोर्चा तालुका अध्यक्ष स्वप्निल सुर्वे, अनुप प्रसादे, रोशन पाष्टे आदी मान्यवरांसह शेकडो संभाजीप्रेमी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button