कृषीमहाराष्ट्र

टेनिस क्रिकेट स्पोर्टस फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी ना. उदय सामंत यांची बिनविरोध निवड

मुंबई दि. १ :- टेनिस क्रिकेट स्पोर्टस फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना.उदय सामंत यांची बिनविरोध निवड झाली. २७ फेब्रुवारीपासून सामंत यांनी अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.

टेनिस क्रिकेट खेळात ९० टक्के मुलं ही सर्वसामान्य कुटुंबातील असतात त्यामुळे त्यांना या खेळात करियर करता यावं, चांगल्या खेळाडूंना नोकरीच्या संधी निर्माण व्हाव्यात, टेनिस क्रिकेटला अधिकृत खेळ म्हणून केंद्र शासनाची मान्यता मिळावी व शालेय शिक्षणात इतर खेळाप्रमाणे टेनिस क्रिकेट चा समावेश व्हावा यासाठी मी युद्ध पातळीवर काम करणार आहे असे श्री. सामंत यांनी सांगितले.

लवकरच महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्याची जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करून टेनिस क्रिकेट खेळाडूंना एक मोठा मंच निर्माण करून देण्याचा मानस मंत्री महोदयांनी व्यक्त केला

यापुढे लेदर क्रिकेट प्रमाणे खेळाडू टेनिस क्रिकेट चा करियर म्हणून विचार करतील अस पोषक वातावरण टेनिस क्रिकेट साठी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात तयार करण्याचा मानस सामंत साहेबांनी बोलून दाखवला.

टेनिस क्रिकेट स्पोर्टस फेडरेशन इंडिया (ITCSF) ला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने एक तरुण तडफदार अध्यक्ष मिळाला आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीत संपूर्ण भारतात टेनिस क्रिकेटचा शिस्तप्रीय पद्धतीने प्रसार होईल असे उदय सामंत यांनी आवर्जून नमूद केले.

31 मार्च ते 5 एप्रिल, 2026 दरम्यान दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणे येथे होणाऱ्या प्रेसिडेंट कप या 16 राज्यांच्या राज्यस्तरीय स्पर्धेदरम्यान टेनिस क्रिकेट स्पोर्टस फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या पुढील योजना व स्पर्धा याबद्दल अधिक माहिती दिली जाईल असे श्री. सामंत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button