रत्नागिरी

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सृजन सायन्स सेंटरला ३२५ विद्यार्थ्यांची भेट – सदानंद भागवत

देवरुख दि. २८ ( प्रतिनिधी ):- २८ फेब्रुवारी या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या औचित्याने देवरुखच्या सृजन विज्ञान केंद्रामध्ये सुप्रसिद्ध विज्ञान प्रचारक संजय पुजारी सर यांच्या विज्ञान विषयक चार कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

विज्ञान दिनानिमित्ताने संस्थेकडून सर्व विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात आला होता. संस्था अध्यक्ष सदानंद भागवत यांनी सांगितले की, देवरुख परिसरातील इयत्ता पाचवी ते नववी च्या एकूण ३५० विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे, हे नक्कीच अभिनंदननी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button