देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची गणपतीपुळे मंदिराचे मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर यांनी घेतली सदिच्छा भेट!
"श्रीं " च्या दर्शनासाठी येण्याचे दिले निमंत्रण!

गणपतीपुळे दि. १ ऑगस्ट (वैभव पवार) :- पुण्याच्या दौऱ्यावर आलेले भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांची महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे संस्थानचे मुख्य पुजारी अभिजीत विनायक घनवटकर यांनी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत अभिजीत घनवटकर यांनी गृहमंत्र्यांशी विविध सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय विषयांवर मनमोकळी चर्चा केली. त्यानंतर अभिजीत घनवटकर यांनी गृहमंत्री शहा यांना श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे श्रींच्या दर्शनाला येण्याचे विशेष निमंत्रण दिले.
यावेळी मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर यांच्या निमंत्रणाचा तात्काळ स्वीकार करत शहा यांनी श्री क्षेत्र गणपतीपुळे हे जागृत देवस्थान आहे. त्यामुळे दर्शन घेण्यासाठी मी नक्की येईन, असे आश्वासन दिले. या सकारात्मक भेटीबद्दल बोलताना अभिजीत विनायक घनवटकर यांनी गृहमंत्र्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, यशस्वी नेतृत्व आणि राष्ट्रसेवेचे अखंड बळ लाभो, अशी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना केली.



