रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पोलीस बँड पथकासह मानवंदना

रत्नागिरी दि. १९ :-  छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पोलीस बँड पथकाच्या मानवंदनेसह औपचारिक अभिवादन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पोलीस बँड पथकाने मानवंदना सादर करत शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम व स्वराज्याच्या विचारांना आदरांजली वाहिली.

रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच पोलीस बँड पथकासह शिवजयंती निमित्त मानवंदना देण्याची ही ऐतिहासिक व अभिमानास्पद घटना असून, यामुळे कार्यक्रमाला विशेष गौरव प्राप्त झाला.

या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक श्री.बी. बी. महामुनी, पोलीस अधिकारी, अंमलदार, पोलीस बँड पथक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button