भाजपाचे रत्नागिरी दक्षिणचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांचा सत्कार

रत्नागिरी दि. २० :- भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या हस्ते नवनिर्वाचित रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांत यादव यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे, बाबू सुर्वे, संतोष सावंत, निलेश आखाडे, नगरसेवक नितीन जाधव, नितीन गांगण, मुन्ना ढेकणे यावेळी उत्तरचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा परिषद सदस्य सौ. रावी मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही प्रशांत यादव यांचे अभिनंदन करून पक्षवाढीसाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात भाजप अधिक जोमाने कार्य करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



