रत्नागिरी
क्षत्रिय मराठा समाज, देवरुखतर्फे शिवजयंती सोहळा

देवरूख दि. १८ (सुरेश सप्रे) :- संगमेश्वर तालुका क्षत्रिय मराठा समाज, देवरुख शिवजयंती सोहळा २०२६ मराठा भवन देवरुख येथे आयोजित केला आहे.
कार्यक्रम रूपरेषा सकाळी ९.०० ते १०.०० शिवपूजन. १०.०० ते १०.३० स्वागत व सत्कार. १०.३० ते १.०० नृत्याविष्कार कार्यक्रम.१.०० अल्पोपाहार सायं. ६.०० भजनसंध्या सायं. ७.०० दिपोत्सव असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन संगमेश्वर तालुका क्षत्रिय मराठा समाज, देवरुख यांनी केले असून सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती केली आहे


