रत्नागिरी

देवरूखात संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

बंजारा समाज सेवा संघ, संगमेश्वर (देवरूख) यांच्यावतीने संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

देवरूख दि. १६ :- बंजारा समाज सेवा संघ, संगमेश्वर (देवरूख) यांच्यावतीने बंजारा समाजाचे परमपूज्य गुरू संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची जयंती देवरूख (पाटगाव) येथे आज रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी सकाळी ११ वा. देवरूख स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथून डीजेच्या तालावर मिरवणूकीला प्रारंभ झाला. यानंतर ही मिरवणूक देवरूख स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते पाटगाव येथील शिवकृपा मंगल कार्यालय अशी काढण्यात आली. या मिरवणुकीत बंजारा समाजबांधव व महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. या मिरवणुकीत बंजारा समाजबांधव पारंपरिक पोशाख परिधान करून सहभागी झाले होते. हे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होते. मिरवणुकीनंतर पाटगाव येथील शिवकृपा मंगल कार्यालयात संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर दुपारी भोजनाचा कार्यक्रम पार पडला.

या जयंती सोहळ्याप्रसंगी संगमेश्वर तालुका बंजारा समाज सेवा संघाचे तालुकाध्यक्ष किरण पवार, उपाध्यक्ष अशोक राठोड, माजी तालुकाध्यक्ष संजय नाईक, सचिव सागर राठोड, खजिनदार अशोक चव्हाण, शिवाजी राठोड, रवी पवार, अशोक जाधव, तुकाराम पवार, शंर राठोड, अप्पू शंकर राठोड, मिथून पवार, पुंडलिक राठोड, बाबू राठोड आदि पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बंजारा समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते. अशाप्रकारे संत सेवालाल महाराज यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button