क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरीतर्फे मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

रत्नागिरी दि. ११ : क्षत्रिय मराठा मंडळातर्फे रत्नागिरी तालुक्यातील मराठा समाजातील दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दि. 20 जून रोजी सायंकाळी 05:00 वा. हॉटेल विवेक येथे करण्यात येणार आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांनी गुणपत्रकांची झेरॉक्स क्षत्रिय मराठा मंडळाच्या कार्यालयात आणून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी दरवर्षी मराठा समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी उपयुक्त अशा कार्यक्रमांचे आयोजन करते. इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असते, हे लक्षात घेऊन रत्नागिरी तालुक्यातील मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. गेली अनेक वर्षे हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
त्याकरिता सन-2025-26 यावर्षी इयत्ता 10 वी च्या परीक्षेला 85 टक्के अथवा अधिक गुण तसेच इयत्ता 12 वीचे परीक्षेमध्ये 80 टक्के अथवा अधिक गुण (गुणपत्रिकेवरील टक्केवारी प्रमाणे) मिळाले आहेत. अशा रत्नागिरी तालुक्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात येणार आहे. त्यासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत आणि शाळा सोडल्याचा दाखला सत्यप्रत सोमवार दि. 17 जूनपर्यंत सकाळी 11.00 ते संध्या 5.00 या वेळेत (रविवार व शासकीय सुट्या सोडुन) क्षत्रिय मराठा मंडळाच्या बेसमेंट स्टोअर क्र.3, बी विंग, सिध्दीविनायक रेसिडेन्सी, मजगाव रोड, रत्नागिरी येथे आणून द्यावी.


