महाराष्ट्ररत्नागिरी

‘सिंधुरत्न कार्यकारी समिती’, सिंधुदुर्गच्या उपाध्यक्षपदी श्री. दीपक केसरकर यांची तर रत्नागिरी समितीच्या उपाध्यक्षपदी डॉ. विनय नातू यांची नियुक्ती

रत्नागिरी दि. १२ :- सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमधील नैसर्गिक साधनसंपत्तीचे परिणामकारक नियोजन करून या जिल्ह्यांचा सर्वंकष विकास करण्याच्या दृष्टीने या दोन जिल्ह्यांसाठी ‘सिंधुरत्न समृध्द योजना २.०’ ही योजना राबविण्यात येणार आहे. ‘सिंधुरत्न समृध्द योजना २.०’ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘सिंधुरत्न कार्यकारी समिती’, सिंधुदुर्गच्या उपाध्यक्षपदी श्री. दीपक केसरकर यांची तर ‘सिंधुरत्न कार्यकारी समिती’ रत्नागिरी उपाध्यक्षपदी डॉ. विनय नातू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमधील नैसर्गिक साधनसंपत्तीचे परिणामकारक नियोजन करून या जिल्ह्यांचा सर्वंकष विकास करण्याच्या दृष्टीने या दोन जिल्ह्यांसाठी ‘सिंधुरत्न समृध्द योजना २.०’ ही योजना सन २०२६-२७ ते २०२८-२९ या ३ वर्षासाठी राबविण्यास  मान्यता देण्यात आली आहे. ‘सिंधुरत्न समृध्द योजना २. ०’ करिता ‘सिंधुरत्न समृध्द योजना २.०’ भाग-२ अंतर्गत स्वतंत्र आराखडा तयार करणे व त्याची कालबध्द अंमलबजावणी करण्याकरिता सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्याकरिता दोन स्वतंत्र “सिंधुरत्न कार्यकारी समिती गठित करण्यात आल्या आहेत.

सदर सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्याकरिता गठित केलेल्या दोन स्वतंत्र “सिंधुरत्न कार्यकारी समिती” च्या संरचनेमध्ये मुख्यमंत्री यांनी नामनिर्देशित केलेली व्यक्ती ‘उपाध्यक्ष’ असेल अशी तरतूद आहे. सदर तदतूदीच्या अनुषंगाने ‘सिंधुरत्न समृध्द योजना २.०’ अंतर्गत सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांकरिता दोन स्वतंत्र गठित करण्यात आलेल्या ‘सिंधुरत्न कार्यकारी समिती’ वर दोन उपाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत.

त्यानुसार ‘सिंधुरत्न समृध्द योजना २.०’ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘सिंधुरत्न कार्यकारी समिती’, सिंधुदुर्गच्या उपाध्यक्षपदी श्री. दीपक केसरकर यांची तर ‘सिंधुरत्न कार्यकारी समिती’ रत्नागिरी उपाध्यक्षपदी डॉ. विनय नातू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button