रत्नागिरी

भालेकर भावकीचे कुळदैवत भैरीभवानी मातेचा त्रैवार्षिक पांजीचा गोंधळ सोहळ्याचे २२ फेब्रुवारी रोजी तांबडी गवळवाडी येथे आयोजन

देवरूख दि. १६ :- संगमेश्वर तालुक्यातील भालेकर भावकीचे कुळदैवत आदिशक्ती भैरीभवानी मातेचा त्रैवार्षिक पांजीचा गोंधळ सोहळा रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी तांबडी गवळवाडी.ता. संगमेश्वर येथे आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा सकाळी ११.०० वाजता उद्देपण दुपारी २.०० वाजता भैरी भवानी मातेचे पुजन सायं. ५वा.भैरी भवानी मातेचा जोगवा संध्या. ७.०० वाजता पतिर भरणे रात्रौ ७.३० ते ८.३० वा. देवीची महाज्योत प्रदक्षिणा पूर्ण झाले नंतर नवस बोलणे व नवस फेडणे रात्रौ९.०० वाजता देवीच्या महाप्रसाद. रात्रौ १०.३० ते स. ५ वा. गोंधळी मंडळी पौराणिक कथानक गोंधळ मांडीला…! आईभवानी हे सादर करण्यात येणार आहे

आपण ज्या कुळामंध्ये जन्म घेतला त्या कुळातील कुळस्वामिनीचे दर्शन घेण्यासाठी सहकुटूंब सहपरिवार, मित्रपरिवारसहित उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती यजमान संदिप पांडुरंग भालेकर यांचेसह समस्त भालेकर भावकीने केली आहे.

खास टिप: संगमेश्वर डेपोमधुन एस. टी. सकाळी ८:०५, दुपारी १२:५५ व संध्याकाळी ४.४५ वा. आहे. (संगमेश्वर / शैबवणे व्हाया गुरववाडी) तांबेडी गवळवाडी बस स्टॉप अशी बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर गुगल लोकेशन – श्री राधाकृष्ण मंदिर, तांबडी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button