रत्नागिरी
बॅंक ऑफिसर्स असोसिएशनच्या बाईक रॅलीची सांगता

देवरुख दि. ८ (सुरेश सप्रे) :- बॅंक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशनच्या पुणे युनिटतर्फे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या बाईक रॅलीतून बँकिंगचा प्रसार करणे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणाला विरोध करणे. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यातील संतुलनास प्रोत्साहन देणे. बँक कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि तंदुरुस्ती जपण्यास पाठबळ देणे.आदी संदेश व प्रसार करणे या उद्देश ठेवून पुणे-कोल्हापूर ते मार्लेश्वर या मार्गावरून ही रॅली देवरूख येथील आठल्ये सप्रे काँलेज मैदानवर समाप्त झाली .
बॅंक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशनच्या पुणे युनिटतर्फे आयोजित केलेल्या या संदेश रॅलीचे देवरूख येथील शहीद सैनिक स्मारक येथे रत्नागिरी विभागातील बँक कर्मचारी व जनतेने या बाईक रँलीत सहभागी झालेल्या बॅकर्सांचे जोरदार स्वागत केले.



