रत्नागिरी

मौजे कळंबस्ते साटलेवाडी येथील रामेश्वर पंचायत मंदिरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

१५ फेब्रुवारीला विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम; मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

संगमेश्वर दि. ८ (प्रतिनिधी) :- संगमेश्वर तालुक्यातील मौजे कळंबस्ते साटलेवाडी येथे सुमारे ३०० वर्षे पुरातन, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर निर्मित रामेश्वर पंचायतन मंदिरात महाशिवरात्री उत्सव दि. १५फेब्रुवारी २०२६ रोजी भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव साटलेवाडी समाजसेवा मंडळ, श्री रामेश्वर पंचायतन मंदिर जीर्णोद्धार समिती आणि समस्त साटलेवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ ते १० या वेळेत महापूजा व अभिषेक, १० ते १ दरम्यान सामुदायिक अभिषेक व महाआरती, दुपारी १ ते २ महाप्रसाद, सायंकाळी ३ ते ५ हळदी-कुंकू समारंभ, ६ ते ७ हरिपाठ, तर रात्री ७ ते ८ पालखी मिरवणूक होणार आहे. याच दिवशी भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून, त्यात महिलांचे आजार तपासणी, तोंड व दातांची तपासणी, रक्तगट, मधुमेह व रक्तदाब तपासणी, अस्थिरोग तसेच ई.सी.जी. तपासणी करण्यात येणार आहे. या पवित्र सोहळ्यासाठी सर्व शिवभक्तांनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button