रत्नागिरी
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी मतदानाचा हक्क बजावला

नाणीज, दि. ७:- श्रीमत जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांनी आज सहकुटुंब नाणीज येथील मतदानकेंद्रावर जाऊन मतदानाचा पवित्र हक्क बजावला.
आज राज्यातील पंचायत समित्या व जिल्हा परिषदेसाठी मतदान सुरू आहे. त्यावेळी त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांच्यासमवेत प.पू. कानिफनाथ महाराज व सौ. सुप्रियाताई होत्या. मतदान केल्यानंतर ते म्हणाले, “लोकशाहीने आपल्याला मतदानाचा अधिकारी दिला आहे. त्यामुळे सर्वांनी आपले कर्तव्य समजून, लोकशाहीचा हक्क म्हणून मतदान करावे.”



