रत्नागिरी

जिल्ह्यात मतदानाला सुरुवात; गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी बजावला मतदानाचा हक्क!

रत्नागिरी दि. ७ :- जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली असून, जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी खेड तालुक्यातील जामगे येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या मातोश्री ज्योती रामदास कदम, पत्नी श्रेया योगेश कदम तसेच भाऊ शैलेश कदम यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

तसेच राजापूरचे आमदार किरण सामंत आणि त्यांच्या पत्नी सौ वर्षा किरण सामंत यांनी जिल्हा परिषद आदर्श शाळा पाली नंबर १ या केंद्रांवर मतदान केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button