चांदोर गावचे प्रतिष्ठीत नागरिक, उद्योजक दत्ताराम तांबे यांच्या हस्ते ग्रामपंचायतमध्ये ध्वजारोहण संपन्न
चांदोर ग्रामपंचायत येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

रत्नागिरी दि. २६ :- तालुक्यातील ग्रामपंचायत चांदोर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण चांदोर गावचे प्रतिष्ठीत नागरिक व उद्योजक श्री. दत्ताराम शेठ तांबे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी उपस्थित चांदोर गावचे उपसरपंच श्री. सुर्यकांत तांबे, उपसरपंच तथा विद्यमान सदस्य श्री. उमेश गोताड, सदस्य श्री. राजेंद्र बनकर, सौ. दिपिका फटकरे, कु.पूजा तोडणकर, सौ.साक्षी चांदोरकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. आनंद कुडाळकर, माजी सरपंच श्री. पद्माकर कोकरे, सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनिल पड्यार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. योगेश पड्यार, श्री. सुनिल गोताड, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. संतोष गोताड, श्री. मारुती फुटक, जि.प.शासकीय कर्मचारी श्री. प्रकाश कांबळे, निरुळ केंद्र प्रमुख तथा शाळा चांदोर नं.1 मुख्याध्यापक श्री राजेशकुमार गुरव, शाळा चांदोर नं.3 मुख्याध्यापक श्री विजय कोलगे, इतर सर्व शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, गावातील सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, कर्मचारी वर्ग, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच शाळा चांदोर नंबर 1 व 3 मधील विद्यार्थांनी देशभक्तीपर समूह गीत तसेच कवायती सादर केल्या. शाळा चांदोर नंबर 3 मधील विद्यार्थांनी मनोरे सादर केले व सर्व उपस्थितांची मने जिंकली. सर्व ग्रामस्थांना ग्रामपंचायतच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.



