
रत्नागिरी दि. ७ :- गोवा येथील आमंत्रित राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये ए. बी. स्पोर्ट्स अकॅडमीने घवघवीत यश मिळविले. सन कु काई कप सीजन 2 गोवा 2025 या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत मध्ये रत्नागिरीतील ए. बी.स्पोर्ट्स अकॅडमी रत्नागिरीच्या 19 कराटे खेळाडूंनी यश संपादन केले.
सदर कराटे स्पर्धा दिनांक 04 जानेवारी 2026 रोजी फोंडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स गोवा येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धा वयोगट व वजन गटामध्ये काता व फाईट या दोन प्रकारामध्ये घेण्यात आल्या. सदर स्पर्धेसाठी केरळ कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र या चार राज्यातील 400 कराटे खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील विजयी झालेले खेळाडू – कु. ईश्वरी तेरेदेसाई ब्रॉझ मेडल ,रमा जाधव सिल्वर मेडल, नेहाली गावकर ब्राँझ मेडल,आयशा बुडये सिल्वर मेडल, हमदान बुडये सिल्वर मेडल,गौरव सोळंकी सिल्वर मेडल, ताहीर मंगा गोल्ड मेडल, निधीश बंडबे ब्रॉझ मेडल,अंकुर कदम ब्रॉझ मेडल , आर्या झोरे गोल्ड मेडल, अनुष्का झोरे सिल्वर मेडल , ध्रुव बसणकर गोल्ड मेडल , त्रिशा गुरव गोल्ड मेडल, रिया माचकर गोल्ड मेडल, अनिस कानसे ब्राँझ मेडल,ओम शिर्के सिल्वर मेडल , आराध्या चव्हाण गोल्ड मेडल , कुमुदिनी गुरव ब्राँझ मेडल या सर्व विद्यार्थ्यांनी काता व फाईट प्रकारांमध्ये चांगली कामगिरी करून आपले रत्नागिरीचे नाव उज्वल केले.
सर्व खेळाडूंना ए. बी. स्पोर्ट्स अकॅडमी चे अध्यक्ष कराटे प्रशिक्षक अरुण बेग यांचे मौलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच टीम कोच प्रथम बेग , टीम मॅनेजर दिव्य यादव, प्रेम बेग या सर्वांच्या सहकार्य लाभले. रत्नागिरीतील मुलांनी केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल सर्वांचे पालक वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे.



