रत्नागिरी

सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डेच्या शिल्प – कला प्रदर्शनास १५ जानेवारी पासून प्रारंभ

संगमेश्वर दि. ९ ( प्रतिनिधी ):- कोकणातील अग्रगण्य चित्र-शिल्प कला महाविद्यालय सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे यांच्या ३२ व्या वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला आणि चित्र प्रदर्शनाला कला प्रेमीनी उपस्थित राहावे असे आवाहन सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव यांनी केले आहे.

या कला प्रदर्शनाचे उद्घाटन व अध्यक्षस्थानआमदार शेखर गोविंदराव निकम हे भूषविणार आहेत..प्रमुख अतिथी जयंत कदम – चित्रकार, सातारा रोहन पवार – शिल्पकार, मुंबई प्रकाश अर्जुन राजशिर्के – चेअरमन, सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे महेश मनोहर महाडिक – सेक्रेटरी, सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे तसेच या कला प्रदर्शनाचे औचित्य साधून प्रतिवर्षी शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदजी निकम कला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या तसेच सामाजिक बांधिलकी जपणार्‍या कलाकाराला या पुरस्काराने गौरवण्यात येते यावर्षी हा गौरव पुरस्कार प्रसाद सत्यवान राणे यांना देण्यात येणार आहे.हे कला शिक्षक असून त्यांनी एस.एस.सी., ए.टी.डी., जी.डी. आर्ट व ए.एम. असे कला शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ते विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

या प्रदर्शनाचे अजून एक खास आकर्षण म्हणजे या कला प्रदर्शनाच्या कलाकृती विक्रीचा आस्वाद कलारसिकांना घेता येणार आहे.तरी जास्तीत जास्त संख्येने आपण प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक शिवाजी यादव यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button