जयगड मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, रत्नागिरी आणि जे.एस. डब्ल्यू फाऊंडेशन जयगड यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन

जयगड दि. १० ऑगस्ट :- जयगड मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था जयगड, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, रत्नागिरी आणि जे.एस. डब्ल्यू फाऊंडेशन जयगड यांचे संयुक्त विद्यमाने जयगड सोसायटी येथे प्रथमच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ७ ऑगस्ट रोजी जे. एस. डब्ल्यू चे संस्थापक स्व. श्री. ओम प्रकाश जिंदल यांच्या ९६ वी जन्म तिथीच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये मच्छीमार बांधव आणि भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उदघाटन प्रसंगी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था जयगड चे चेअरमन रिझवान होडेकर आणि सदस्य, जेष्ठ नागरिक अयुब सोलकर, बशीर अहमद जैनुद्दीन सांगरे सि. एस. आर विभाग प्रमुख अनिल दधिच, संपदा धोपटकर आणि सहकारी उपस्थित होते.
‘रक्तदान श्रेष्ठ दान ‘चा संदेश या वेळी देण्यात आला. रक्तदात्यांना संस्था व इंडियन रेड क्रॉस सोसायटी, रत्नागिरी यांचे वतीने प्रशस्ती पत्रक आणि जे. एस डब्ल्यू फाउंडेशन च्या वतीने अल्पोपहार व भेट वस्तू देण्यात आली. ओ.पी.जिंदल यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने जे.एस.डब्ल्यू च्या कर्मचारी, गावातील तरुणांनी कंत्राटदार यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले
हे शिबीर यशस्वी होण्यासाठी जयगड मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था जयगड चे चेअरमन रिझवान होडेकर, व्हा. चेअरमन नितीन पवार, सदस्य मुस्तकीम नेवरेकर, समीर मुजावर, नासिर माखजनकर, सचिव मुनताह टेमकर, माजी सरपंच फरझाना डांगे, नबील जांभारकर, शराफत गडबडे आणि संस्था सदस्य, तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटी, रत्नागिरी यांनी सहकार्य केले.



