मालगुंड कोमसाप शाखेची १२ ऑगस्ट रोजी विशेष सभा!

गणपतीपुळे दि. १० ऑगस्ट (वैभव पवार) :- कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड ची विशेष सभा बुधवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.०० वाजता कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत ऑगस्ट २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या श्रावण धारा मनामनातील या कार्यक्रमाबाबत नियोजन करणे,सर्व सदस्यांना आय.डी.देणे असा विषय घेण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक सदस्याने आपला पासपोर्ट साईज फोटो न विसरता घेऊन यावा असे कळविण्यात आले आहे. तसेच कवी केशवसुत स्मारक अपडेट करणे बाबत माहिती देण्यात येणार आहे. या सभेला सर्व सभासदांनी वेळेत हजर रहावे असे आवाहन कोमसाप शाखा मालगुंडच्या अध्यक्षा नलिनी खेर आणि सचिव विलास राणे यांनी केले आहे.
मालगुंड येथील कोकण मराठी साहित्य परिषद शाखेच्यावतीने दरवर्षी श्रावण महिन्यात श्रावणधारा मनामनातील हा विशेष उपक्रम राबविला जातो. या उपक्रमामध्ये शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटातील कवी व साहित्यिकांना सहभागी करून घेऊन त्यांना एक नवी पर्वणी उपलब्ध करून दिली जाते.
यंदाही याच विशेष कार्यक्रमाचे नियोजन सदर बैठकीत होणार असून या सभेला सदस्यांनी उपस्थित राहून नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे कळविण्यात आले आहे.



