क्रीडारत्नागिरी

कराटे दो असोसिएशन महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशिप 2025 – 26 साठी जिल्हास्तरीय निवड चाचणी

रत्नागिरी दि. ९ :- कराटे दो असोसिएशन महाराष्ट्र यांच्यामार्फत सीनियर आणि २१ वर्षा खालील राज्यस्तरीय कराटे स्पर्धा 2025-26 आयोजन अहिल्यानगर, महाराष्ट्र येथे दिनांक १७ व १८ जानेवारी रोजी करण्यात आलेले आहे. राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दि. ११ जानेवारी रोजी कराटे असोसिएशन रत्नागिरी या जिल्हा संघटनेमार्फत जिल्हास्तरीय निवड चाचणी घेण्यात येणार आहे.

तरी कराटे इंडिया ऑर्गनायझेशन व कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संघटनेशी संलग्न असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कराटे प्रशिक्षकांनी जिल्हास्तरीय कराटे निवड चाचणीमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हा संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष/ सचिव यांच्याशी संपर्क साधावा.

स्पर्धा स्थळ :- जिल्हा क्रीडा संकुल छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, मारुती मंदिर रत्नागिरी

स्पर्धा वेळ :- सकाळी 11.00 वाजता उपस्थित राहावे

मोबाईल नंबर – 9422053283,9422372297 9422053928, 7875395386

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button