रत्नागिरी

रत्नागिरी ग्राहक पेठ आयोजित श्रावण महोत्सवाचे ५ ते ८ सप्टेंबर दरम्यान आयोजन

उद्योजिकांसाठी स्टॉल बुकिंग सुरू

रत्नागिरी दि. ९ ऑगस्ट : उदयोन्मख उद्योजिकांना व्यवसायाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘रत्नागिरी ग्राहक पेठ’ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य ‘श्रावण महोत्सव’ प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. हे भव्य प्रदर्शन शनिवार दिनांक ५ सप्टेंबर २०२६ ते मंगळवार दिनांक ८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत जयेश मंगल कार्यालय, माळनाका, रत्नागिरी येथे पार पडणार आहे.

पवित्र गणेशोत्सवाच्या सणाची खरेदी याच पवित्र महिन्यात एकाच छताखाली ग्राहकांना करता यावी आणि महिला उद्योजकांना आपल्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने एकत्र येऊया… समृद्ध होऊया… या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विविध वस्तूंचे स्टॉल्स असणार आहेत.

आपला स्टॉल आजच बुक करा

या प्रदर्शनात स्टॉल नोंदणीसाठी उद्योजिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्टॉल बुकिंग आणि अधिक माहितीसाठी प्राची शिंदे यांच्या ९७६४४१७०७९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. महिला उद्योजकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि रत्नागिरीकर नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button