आगामी महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे “स्टार प्रचारक” यादी जाहीर; यादीत ४० नेत्यांचा समावेश

मुंबई दि. २५ :- आगामी महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे “स्टार प्रचारक” यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये ४० नेत्यांचा समावेश आहे.
शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते श्री. एकनाथ शिंदे (उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, आगामी महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे “स्टार प्रचारक” यादी खाली प्रमाणे अधिकृतरीत्या या प्रसिद्धी पत्राद्वारे जाहीर करण्यात येत आहे. या यादीत खाली नेत्यांचा समावेश आहे.
१. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब, मा. मुख्य नेते व उप-मुख्यमंत्री
२. श्री. रामदास कदम, नेते
३. श्री. गजानन कीतीकर, नेते
४. श्री. आनंदराव अडसूळ, नेते
५. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार आणि शिवसेना संसदीय गट नेते
६. श्री. प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री
७. डॉ. निलमताई गो-हे, नेत्या
८. सौ. मिनाताई कांबळी, नेत्या
९. श्री. गुलाबराव पाटील, नेते व मंत्री
१०. श्री. दादाजी भुसे, उपनेते व मंत्री
११. श्री. उदय सामंत, उपनेते व मंत्री
१२. श्री. शंभूराज देसाई, उपनेते व मंत्री
१३. श्री. संजय राठोड, मंत्री
१४. श्री. संजय शिरसाट, प्रवक्ते व मंत्री
१५. श्री. भरतशेठ गोगावले, उपनेते व मंत्री
१६. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री
१७. श्री. प्रताप सरनाईक, मंत्री
१८. श्री. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री
१९. श्री. योगेश कदम, राज्यमंत्री
२०. श्री. दिपक केसरकर, प्रवक्ते व आमदार
२१. श्री. श्रीरंग बारणे, उपनेते व खासदार
२२. श्री. धैर्यशील माने, खासदार
२३. श्री. संदीपान भुमरे, खासदार
२४. श्री. नरेश म्हस्के, खासदार
२५. श्री. रवींद्र वायकर, खासदार
२६. श्री. मिलिंद देवरा, खासदार
२७. डॉ. दिपक सावंत, उपनेते व माजी मंत्री
२८. श्री. शहाजी बापू पाटील, उपनेते व माजी आमदार
२९. श्री. राहुल शेवाळे, उपनेते व माजी खासदार
३०. डॉ. मनिषा कायंदे, सचिव व आमदार
३१. श्री. निलेश राणे, आमदार
३२. श्री. संजय निरुपम, प्रवक्ते
३३. श्री. राजू वाघमारे, प्रवक्ते
३४. डॉ. ज्योती वाघमारे, प्रवक्ते
३५. श्री. पूर्वेश सरनाईक, युवासेना कार्यध्यक्ष
३६. श्री. राहुल लोंढे, युवसेना सचिव
३७.श्री. अक्षयमहाराज भोसले, शिवसेना प्रवक्ते व अध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना
३८.श्री. समिर काझी, कार्याध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग
३९. श्रीमती. शायना एन.सी., राष्ट्रीय प्रवक्त्या
४०. श्री. गोविंदा अहुजा, माजी खासदार



