रत्नागिरी

आर्ट सोसायटी ऑफ इंडिया स्पर्धेत सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डेची उल्लेखनीय यशस्वी कामगिरी

संगमेश्वर दि. २५ ( प्रतिनिधी ):- आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई यांच्या प्रतिष्ठित कला स्पर्धेत सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे येथील प्राध्यापक व विद्यार्थ्यांची निवड होऊन संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या स्पर्धेत महाविद्यालयातील प्राध्यापक रुपेश सुर्वे यांची तसेच विद्यार्थ्यांमध्ये सार्थक आदवडे, पंकज सुतार, विशाल गोवळकर आणि यशोदीप घुले यांची निवड झाली आहे.ही निवड सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे येथे दिल्या जाणाऱ्या दर्जेदार कला शिक्षणाची आणि सातत्यपूर्ण सृजनशीलतेची पावती असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व संगमेश्वर–चिपळूण मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, सेक्रेटरी महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार व शिल्पकार मा. प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के, सौ. पूजाताई निकम, अनिरुद्ध निकम कलामहाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. माणिक यादव तसेच सर्व प्राध्यापकवर्ग यांनी यशस्वी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button