
रत्नागिरी दि. ३१ :- शिवसेनेकडून राज्यातील विभागीय संपर्क प्रमुख पदांची घोषणा करण्यात आली असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विभागीय संपर्कप्रमुखपदी राजापूर – लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची निवड करण्यात आली आहे.
शिवसेनेकडून नुकतीच विभागीय संपर्कप्रमुख पदांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना रत्नागिरी – सिंधुदुर्ग विभागीय संपर्कप्रमुखपदी राजापूर – लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांची निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निवडीबद्दल आमदार किरण सामंत यांचे कार्यकर्त्यांकडून जोरदार अभिनंदन केले जात आहे.



