क्रीडारत्नागिरी

वाटद कवठेवाडी शाळेने पटकाविले केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद

सातत्यपूर्ण कामगिरीच्या माध्यमातून सांघिक वैयक्तिक खेळातील यशामुळे सलग चौथ्या वर्षी यश

खंडाळा दि. १३ : रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील वाटद केंद्राच्या शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ या वर्षीच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद खंडाळा या शाळेच्या मैदानावर संपन्न झाल्या. या स्पर्धेत वाटद केंद्रातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेने सांघिक व वैयक्तिक खेळातील यशामुळे सलग चौथ्या वर्षी केंद्राचे सर्वसाधारण विजेतेपद (चॅम्पियन ट्रॉफी) पटकावत यश संपादन केले आहे.

विद्यार्थ्यांच्या क्रीडाविषयक सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी हिवाळी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. शैक्षणिक वर्षे २०२५ – २६ यावर्षीच्या रत्नागिरी तालुक्यातील वाटद केंद्राच्या हिवाळी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांनी कबड्डी मुलगे, खो खो मुलगे आणि लंगडी या सामूहिक क्रीडा प्रकारात आपले सर्वस्व झोकून देत प्रथम विजेता क्रमांक व खो खो मुली या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. तर वैयक्तिक क्रीडा प्रकारात

वैयक्तिक क्रीडा प्रकारात थाळीफेक मुलगे मयुरेश मारुती कुर्टे प्रथम क्रमांक, गोळाफेक मुलगे रुद्र माधव अंकलगे – प्रथम क्रमांक, लांब उडी मुलगे शुभम शरद बारगुडे प्रथम क्रमांक, लांब उडी मुलगे स्वराज महेश तांबटकर द्वितीय क्रमांक, लांब उडी मुली स्वरा विश्वनाथ कुर्टे तृतीय क्रमांक, उंच उडी मुलगे स्वराज महेश तांबटकर प्रथम क्रमांक, धावणे मुली दुर्वा मारुती कुर्टे द्वितीय क्रमांक, बुद्धिबळ मुली मिताली महेश माने प्रथम क्रमांक, यांनी क्रमांक पटकावत यश संपादन करून शाळेच्या यशाची पताका सर्वदूर पोहचवली.

या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर मिळविलेल्या सर्व विजयामुळे सलग चौथ्या वर्षी वाटद केंद्राचे सर्वसाधारण विजेतेपद ( चॅम्पियन ट्रॉफी) जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेला मिळाले आहे.

यासाठी शाळेचे मुख्याध्यापक माधव विश्वनाथ अंकलगे, उपशिक्षिका राधा नारायणकर यांनी शाळेचे बालरक्षक श्री. विश्वनाथ विठ्ठल शिर्के, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा निकिता नितीन कुर्टे, उपाध्यक्ष सागर घवाळी, सदस्य उदय रहाटे, पालक पंकेश धनावडे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि वाटद कवठेवाडी, वाटद तांबटकरवाडी, वाटद धोपटवाडी मधील सर्व पालक आणि सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात सराव घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स्पर्धेच्या दिवशी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

या यशाबद्दल पंचायत समिती रत्नागिरीच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय सोपनूर, गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, वाटद केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष मोहिते, वाटद ग्रामपंचायतचे सरपंच अमित वाडकर, ग्रामविकास अधिकारी आर. पी. प्रक्षाळे, माजी सरपंच तथा शाळा विकास समितीचे अध्यक्ष अप्पा धनावडे, विलास बारगुडे, रमेश तांबटकर, सुवर्णा धनावडे, वैशाली कुर्टे, गौरव धनावडे यांच्यासह शाळा विकास समितीचे सर्व सदस्य, पालक आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

सातत्यपूर्ण कामगिरीच्या माध्यमातून मिळविलेल्या यशाबद्दल सर्वच स्तरांतून कौतुक करतांनाच अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button