श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे येणाऱ्या भाविकांची जेवणाची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी संस्थानने मोफत प्रसादाच्या वेळेत केली वाढ
श्रीदेव गणपतीपुळे देवस्थानच्या वतीने हाती घेतला स्तुत्य उपक्रम!

रत्नागिरी दि. २४ :- युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद झाल्याने गणपतीपुळे येथील हॉटेल बंद झालेली आहेत. श्रीदेव गणपतीपुळे संस्थान यांचे वतीने भाविकांची जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून देवस्थान मार्फत रोज दिल्या जाणाऱ्या मोफत प्रसादाची वेळ वाढविणेचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीदेव गणपतीपुळे देवस्थानच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
पश्चिम आशियातील युद्धामुळे देशातील गॅस वितरणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाने कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद केला असून, त्याचा थेट परिणाम हॉटेल व्यावसायिकांवर झाला आहे. अनेक हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. श्री क्षेत्र गणपतीपुळे येथेही हीच परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक हॉटेल व्यावसायिकांना हॉटेल बंद केली आहेत. श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने या भाविकांची जेवणाची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे भाविकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी श्रीदेव गणपतीपुळे संस्थान यांचे वतीने देवस्थान मार्फत रोज दिल्या जाणाऱ्या मोफत प्रसादाची वेळ वाढविणेचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता गणपतीपुळे येथे येणाऱ्या भाविकांना दुपारी -१२.३० ते ३.०० आणि सायंकाळी -७.९५ ते ८.४५ या वेळेत श्रीदेव गणपतीपुळे संस्थान यांचे वतीने मोफत प्रसाद दिला जाणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानकडून करण्यात आले आहे. श्रीदेव गणपतीपुळे देवस्थानच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.



