शिष्यवृत्ती परीक्षेत पैसा फंडची क्रिशा इंदानी गुणवत्ता यादीत

संगमेश्वर दि. ४ ( प्रतिनिधी ):- व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कुल संगमेश्वरची विद्यार्थीनी क्रिशा इंदानी हीने आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे. क्रिशाच्या या उज्वल यशाबद्दल संस्था आणि प्रशालेतर्फे भेटवस्तू देवून आज तिचा सन्मान आणि अभिनंदन करण्यात आले.
क्रिशा इंदानी ही विद्यार्थीनी वक्तृत्व, कथाकथन, निबंध, हस्ताक्षर, विज्ञान रंजन, कला अशा विविध विषयात सातत्याने उत्तम यश मिळवत आली आहे. यावर्षी शासनातर्फे घेण्यात आलेल्या आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून यामध्ये क्रिशाने गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. क्रिशाच्या या यशाबद्दल तिचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी आदिनी भेट वस्तू देत अभिनंदन केले आहे.

