
रत्नागिरी दि. १९ :- कै. सौ. नीला व कै. श्री मधुकाका परचुरे यांच्या स्मृतीप्रीतर्थ परचुरे परिवार व कॅरम प्रेमी मित्र मंडळ गुहागर आयोजित रत्नागिरी जिल्हा कँरम असोसिएशनच्या सहकार्याने व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने या वर्षातील १० वी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा २०२५ कै. इंदिरा वासुदेव शेटे सभागृह (भंडारी भवन) गुहागर , जिल्हा रत्नागिरी येथे दिनांक ८ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पुरुष एकेरी व महिला एकेरी या गटात होणार आहे. स्पर्धेत विजेताना रुपये एक लाखाची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
सदर स्पर्धेची पुरुष खुली व महिला एकेरीची प्रवेशिका रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सेक्रेटरी श्री मिलिंद साप्ते मोबाईल नंबर ९४२२४३३०५५ यांचाकडे दिनांक ३०/१०/२०२५ सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्पर्धा शुल्कासह द्यावी. त्यानंतर आलेल्या कोणत्याही प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही. सदर स्पर्धेसाठी स्पर्धा शुल्क रुपये ७००/- व महाराष्ट्र राज्य नोंदणी शुल्क रुपये १००/- असे आहे.
प्रवेशिका देताना खेळाडूने आपले संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, इमेल आय डी, व जन्म तारीख देणे आवश्यक आहे. १८ वर्षाखालील मुले व मुली यांना या स्पर्धेत भाग घ्यावयाचा असल्यास त्यांना स्पर्धा शुल्क रुपये ३५०/- असेल. स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचा लोगो असलेला सफेद टी शर्ट परिधान करणे आवश्यक आहे.
स्पर्धेत जिल्हातील जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घ्यावा असे आवाहन स्पर्धा आयोजक श्री. प्रदीप परचुरे व कॅरम प्रेमी मित्र मंडळ गुहागर, श्री. सुचय अण्णा रेडीज (सल्लागार, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ), श्री. प्रदीप भाटकर (अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ), श्री. सुरेंद्र देसाई (उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ), श्री. नितीन लिमये (खजिनदार, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ), श्री. मिलिंद साप्ते (सेक्रेटरी, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ) यांनी केले आहे.



