रत्नागिरीतील प्रभाग ५ मध्ये महायुतीचा झंझावात; सौरभ मलुष्टे आणि पूजा पवारांची प्रचारात जोरदार मुसंडी!
'पद नसतानाही विकास'; सौरभ मलुष्टे आणि पूजा पवारांच्या कार्याची प्रभाग ५ मध्ये चर्चा!

रत्नागिरी दि. ३० : रत्नागिरी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच प्रभागांमध्ये प्रचाराचा धुराळा उडाला असला तरी, प्रभाग क्रमांक ५ मध्ये मात्र महायुतीचे उमेदवार सौरभ मलुष्टे आणि पूजा पवार यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.
विकासकामांच्या जोरावर मतदारांची पसंती
गेल्या ६ वर्षांत कोणत्याही पदावर नसताना देखील सौरभ मलुष्टे आणि पूजा पवार यांनी प्रभागात विकासकामांचा धडाका लावला आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून या दोघांनी प्रभागात मोठ्या प्रमाणावर निधी आणून अनेक महत्त्वपूर्ण कामे मार्गी लावली आहेत. “पद नसतानाही काम करणाऱ्या” या उमेदवारांच्या कार्यतत्परतेमुळे प्रभागातील नागरिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे चित्र आहे.
दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक बांधीलकी
निवडणूक असो वा नसो, सौरभ मलुष्टे, दीपक पवार आणि पूजा पवार ही मंडळी नागरिकांच्या सुख-दुःखात नेहमीच सहभागी असतात. कोणत्याही नागरिकाच्या हाकेला धावून जाणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. केवळ राजकारणच नव्हे, तर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यातही हे उमेदवार नेहमीच अग्रेसर असतात. याच दांडग्या जनसंपर्कमुळे मतदारांचा कल त्यांच्या बाजूने झुकलेला दिसत आहे.
राजकीय वर्तुळात विजयाचा विश्वास
प्रभाग ५ मधील नागरिकांशी संवाद साधला असता, “विकासाची दृष्टी असलेल्या सौरभ मलुष्टे आणि पूजा पवार यांच्या हातीच आम्ही नगरसेवक पदाची सूत्रे देणार,” असा विश्वास अनेकजण व्यक्त करत आहेत.
राजकीय जाणकारांच्या मते, या प्रभागातून महायुतीचे हे दोन्ही उमेदवार आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा सुर्वे यांना मोठे मताधिक्य मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रभाग ५ मधील मतदारांचा उत्साह पाहता, आगामी ३ तारखेचा निकाल हा महायुतीच्या बाजूनेच लागेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून आणि राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.



