मनाचे श्लोक’, ‘सूर्यनमस्कार’ स्पर्धांचे आयोजन; ५ डिसें. अंतिम तारीख

रत्नागिरी दि. ३० : ’समर्थ भारत अभियान’ आणि ’श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ’मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धा आणि ’सूर्यनमस्कार’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने ’मन आणि मनगट’ या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा आहे, अशी माहिती समर्थ भारत अभियानचे राजीव नगरकर आणि ’श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे संजीव जावळे यांनी दिली.
नगरकर म्हणाले, या स्पर्धा नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान होत असून, प्राथमिक फेरी शाळास्तरावर घेतली जाईल. त्यानंतर आंतरशालेय फेरी आणि राज्यस्तरीय अंतिम फेरी फेब्रुवारीच्या पहिल्या अथवा दुसर्या आठवड्यात पार पडेल. ’मनाचे श्लोक’ ही वैयक्तिक, तर ’सूर्यनमस्कार’ ही सांधिक स्पर्धा असून, बालवाडीपासून ते पालक-शिक्षक गटांपर्यंत विविध वयोगटांसाठी स्पर्धा खुल्या राहणार आहेत.
प्रत्येक गटातील विजेत्यांना प्रथम तीन व उत्तेजनार्थ दोन अशी बक्षिसे देण्यात येतील. या स्पर्धा सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर, अकोला, वाशीम, धाराशिव, लातूर, संभाजीनगर, नाशिक, सातारा, कराड, रत्नागिरी, उल्हासनगर, बदलापूर, मुलुंड, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे
सदर स्पर्धेसाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तरी ज्या शाळेतील मुलांना सहभागी व्हायचे असेल त्या शाळेतील शिक्षकांनी ५ डिसेंबर २०२५ पर्यंत सौ. पर्णिका मुळ्ये ९७६३१३४५७४, सौ. स्नेहल भट ९४०३४६१३७० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.



