रत्नागिरी

ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, बोरज येथे ९ ते १४ वयोगटातील मुलींनी घेतली HPV लस

रत्नागिरी दि. २५ :- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व तालुका आरोग्य अधिकारी डॉ शैलेश खरटमोल यांचे मार्गदर्शनाखाली दि 25/11/2025 रोजी प्रा.आ.केंद्र शिव बु.!! उपकेंद्र मोरवंडे अंतर्गत ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल,बोरज ता. खेड येथे 9 ते 14 वयोगटातील मुलींना HPV लसीकरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रा.आ.केंद्र शिव बु.!! चे मा. वैद्यकीय अधिकारी डॉ कांबळे सर यांनी HPV लसींबाबत माहीती दिली व लसीकरणापूर्वी किरकोळ तपासणी केली व लसीकरण करण्यात आले. एकूण 104 मुलींनी एच पी व्ही लस घेतली.

यावेळी डॉ कांबळे (वैद्यकीय अधिकारी) शिक्षकवृंद, श्रीमती डी डी पांचाळ ,सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा स्वंयसेविका, मदतनीस phc वाहनचालक व बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल येथील आपत्कालीन अँब्युलन्ससह टीम उपस्थित होते.

एच पी व्ही (HPV ) बद्दल माहिती:

एच पी व्ही (HPV) म्हणजे काय ?

-HPV म्हणजे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस.हा विषाणू लैंगिक संपर्कातून पसरतो.यामुळे गर्भाशय मुखाचा कॅन्सर तसेच इतर काही कॅन्सर होऊ शकतात.

-एच पी व्ही (HPV) लस ही सुरक्षित व परिणामकारक आहे.

-९ ते १४ वयोगटातील मुलींना मोफत लस उपलब्ध.

-गर्भाशय मुखाचा कॅन्सर टाळण्यासाठी लस हा प्रभावी उपाय.

-लहान वयात घेतलेली लस आयुष्यभर संरक्षण देते.

-लसीकरणानंतरही नियमित आरोग्य तपासणी आवश्यक.

-आई-वडिलांनी 9-14 वर्षे वयोगटातील मुलींचे लसीकरण करून घ्यावे.

-कॅन्सरमुक्त समाजासाठी (HPV) लस घ्या – इतरांनाही प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

-जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button