रत्नागिरी

रत्नागिरीतील प्रभाग क्रमांक ५ , ६ मधील महिलांच्या सोयीसाठी सामंत बंधूंच्या मार्गदर्शनाखाली वसुबारसेला गाय-वासरू पूजनाची विशेष व्यवस्था!

रत्नागिरी दि. १७ :- राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. डॉ. उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाने प्रभाग क्रमांक ५ आणि ६ मधील महिलावर्गाची वसुबारस निमित्त होणारी गैरसोय लक्षात घेऊन शिवसेना महिला उपशहर प्रमुख पूजा दीपक पवार यांनी स्तुत्य उपक्रम राबविला आहे. यंदाच्या वसुबारस (गोवत्स द्वादशी) या सणाच्या दिवशी गाय आणि वासरू यांच्या पूजनाची खास व्यवस्था ‘बाळासाहेब ठाकरे ऍक्टिव्हिटी सेंटर, साळवी स्टॉप’ येथे करण्यात आली आहे.

भारतीय संस्कृतीत गाय आणि वासरू यांचे महत्त्व अनमोल आहे, आणि वसुबारसेला या दोघांची पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र, शहरी भागात अनेक महिलांना पूजेसाठी गाय आणि वासरू उपलब्ध होण्यात अडचणी येत होत्या. याच समस्येची दखल घेत, शिवसेना महिला उपशहर प्रमुख सौ. पूजा दीपक पवार यांनी महिलांची गैरसोय दूर करण्यासाठी पुढाकार घेतला.

ना. उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘बाळासाहेब ठाकरे ऍक्टिव्हिटी सेंटर’ येथे पूजनाची योग्य आणि सुरक्षित व्यवस्था केल्यामुळे प्रभाग क्रमांक पाच आणि सहा मधील तसेच परिसरातील तमाम नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सौ. पूजा दीपक पवार यांनी केले आहे. या व्यवस्थेमुळे महिलांना त्यांच्या पारंपारिक सणाची पूर्तता करणे आता अधिक सोपे झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button