पैसा फंड मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; विद्यार्थ्यांनी घेतल्या विविध शपथ

संगमेश्वर दि. १५ ऑगस्ट ( प्रतिनिधी ):- व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कुल संगमेश्वर येथे स्वातंत्र्य दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संस्था पदाधिकाऱ्यांसह परिसरातील व्यापारी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रारंभी व्यापारी पैसा फंड संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्था उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, नरेंद्र कुष्टे, जितेंद्र प्रसादे,सचिन नारकर, समीर शेरे, गुलाम पारेख, उदय करमरकर, विनय मुरकर, मिनार झगडे, अंब्रे, गुलाम खान, नितीन शेट्ये, अभिषेक विचारे, सुमेध सावरकर, ओंकार लोध,चरकरी मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीत, संविधान, समूह गीत, सामुदायिक कवायत, छात्रसेना संचलन तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशालेतील दहावी, बारावी, शिष्यवृत्ती, एन एन एम एस, पाककृती स्पर्धा अशा विविध परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तु, प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. प्रशालेची विद्यार्थीनी क्रिशा दायमा हिने सर्वांना साक्षरतेची, व्यसनमुक्ती, समानतेची अशा विविध शपथ दिल्या.
संगमेश्वर येथील व्यापारी दिलीप रहाटे, संदेश कापडी, ज्येष्ठ नागरीक संघांचे उदय संसारे, विनोद मुळे यांनी प्रशालेला भेट देवून, विविध उपक्रमांची माहिती घेत विद्यार्थ्यांचे कौतुक केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चिता कोकाटे यांनी तर स्वातंत्र्य दिनाचे नियोजन क्रीडा शिक्षक नवनाथ खोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलं.



