रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात यशस्वी रित्या राबवण्यात आले “सागर कवच अभियान – ०२/२५”

रत्नागिरी दि. २१ :- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दि. १९ नोव्हेंबर रोजी ६ वा ते दिनांक २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत “सागर कवच अभियान ०२/२५” अभियान राबविण्यात आले.

या अभियानामध्ये रत्नागिरी पोलीस दल, तटरक्षक दल, नौदल, कस्टम, बंदर विभाग, फिशरी विभाग, समुद्र किनाऱ्यावरील खासगी बंदरे, जेट्टी आस्थापना ह्या सहभागी झाल्या होत्या. सदर अभियान भारतीय तट रक्षक दलाकडून एकाच वेळी महाराष्ट्र व गोवा राज्यात राबविण्यात आले.

या अभियानाचा उद्देश सागरी मार्गाने होणाऱ्या घुसखोऱ्या व आतंकवादी कारवाई रोकणे तसेच सागरी सुरक्षेशी संबंधित सर्व विभागांनी घ्यावयाची खबरदारी व युद्धजन्य परिस्थितीत प्रतिसाद यांचा सराव करणे व किनारपट्टी सुरक्षे संबंधी सर्व सागरी घटकांना प्रशिक्षण देणे व सागरी सुरक्षा घटकांमध्ये समन्वय साधणे.

या अभियाना दरम्यान दिनांक 19/11/2025 रोजी 13.25 वा शत्रू पक्ष (टेड फोर्स) कडून एक घुसकोर टीम बोटी द्वारे रत्नागिरी समुद्र किनाऱ्याच्या दिशेने पाठविण्यात आलेली होती. या अभियान मधील बचावाचे काम करणाऱ्या सुरक्षा एजन्सी (ब्ल्यू फोर्स) कडून “आई लाभ-लक्ष्मी” या ट्रॉलर बोट पेट्रोलिंग दरम्यान लाइट हाऊस रत्नागिरी समोरील अरबी समुद्रात 3.5 नॉटिकल मैल अंतरावर सदर रेड फोर्स (शत्रू पक्ष) “नवदुर्ग” नावाची IND-MH-06-199 | 09 एक बोट संशयास्पद फिरताना पकडण्यात आलेली आहे व सदर दलाने बोटीवर चढून चौकशी केली असता बोटीवर अभियाना मधील संशयित 06 इसम मिळून आल्याने बचावाचे काम करणाऱ्या सुरक्षा एजन्सी (ब्ल्यू फोर्स) यशस्वी झालेली आहे.

या अभियानामध्ये पोलीस अधिकारी 48, पोलीस अंमलदार 464, होमगार्ड 100, सुरक्षा वार्डेन 47, सागर रक्षक दल सदस्य 41, पोलीस पाटील 68, एन.सी.सी कॅडेट 44, एन.एस.एस विद्यार्थी 40, अधिग्रहीत ट्रॉलर 02 इतके मनुष्यबळ वापरण्यात आलेले आहे.

या अभियाना दरम्यान एकूण 4,787 विविध वाहने चेक करण्यात आली तर 9,789 व्यक्ती चेक करण्यात आल्या. समुद्रातील विविध 80 बोटी व या बोटीवरील 960 व्यक्ति चेक करण्यात आलेल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button