रत्नागिरी

नवेदर कोंडसर येथे कांदळवन कक्षामार्फत महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन शिबिर

शिंदाने व खेकडे पालनासह विविध प्रकल्पांवर 90% सबसिडीची माहिती

जैतापूर दि. २१ :- महाराष्ट्र शासनाच्या कांदळवन कक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक व रोजगाराभिमुख योजनांविषयी माहिती देण्यासाठी नवेदर कोंडसर येथे महिला बचत गटांसाठी त्रिवेणी संघ आणि संकल्प गाव समितीच्या माध्यमातून विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विविध प्रकल्पांची माहिती देत शासनाकडून मिळणाऱ्या 90% सबसिडीविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरात शिंदाने पालन, खेकडे पालन, कालवे निर्मिती, शोभिवंत मासे निर्मिती, मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती यासारख्या प्रकल्पांवर प्रशिक्षण देण्यात आले. या प्रकल्पांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी व उत्पन्नवाढीचे मार्ग खुला होत असून, स्थानिक स्तरावर रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.

या शिबिराला कांदळवन कक्षाच्या प्रकल्प समन्वयक प्रिया कांबळे , नयन घडशी तसेच जलजीविका प्रकल्पाचे रोहन गुरव व प्रज्योत कांबळे आणि त्रिवेणी लोकसंचलित केंद्राचे व्यवस्थापक राजन लाड यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमासाठी त्रिवेणी संघाच्या पदाधिकारी सुषमा पांचाळ, राजश्री पांचाळ, विद्या दाते आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आणि बचत गटातील सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन उत्कृष्ट आयोजन केले.

शिबिराला त्रिवेणी संघाच्या लेखापाल रूपाली मोरे, प्रतिभा मोहिते, प्रज्ञा भडेकर यांसह नवेदर कोंडसर गावातील सर्व बचत गटांतील शंभर ते दीडशे महिला उत्स्फूर्तपणे उपस्थित होत्या.

या उपक्रमामुळे महिलांमध्ये पर्यावरण संवर्धनासोबत आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा निर्माण झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button