रत्नागिरी

चिपळूणात २५ ऑक्टोबरला रंगणार महिलांचे पहिले नमन

रत्नागिरी दि. २३ :- महाराष्ट्रातील पहिले असे कोकणची सांस्कृतिक कला जपण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील महिलांचे पहिले नमन रंगभूमीवर आभार संस्था संचलित माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी यानी प्रथमच रसिक श्रोत्यासाठी आणले आहे. नमन मडळाचा कार्यक्रम शनिवार दि 25/10/25 रोजी सायंकाळी 5 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत इंदिरा गांधी सांस्कृतिक केद्र चिपळूण येथे होणार आहे

नमन मंडळाचा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्र राज्यात सर्वत्र विविध माध्यमातून रसिक श्रोत्याच्या मनपसंतीस उतरत आहे. यासाठी त्यांच्या दूरदृष्टीत्वाचे मनापासून सर्वत्र कौतुक होत आहे.  विविध ठिकाणी या मंडळाचे प्रयोग सादरीकरण होत आहेत.  कोकणची नमन कला हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी केलेला हा प्रयत्न सफल होताना दिसत आहे. वय वर्षे 72ते 15 वयोगटातील या महिला कलाकारांनी सादर केलेले नमन हे एक शिवधनुष्य उचलल्या सारखेच आहे. चिपळूण येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी रू 200/ रु 100/ प्रवेशिका इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे ठेवण्यात आली आहेत

लेखक दिग्दर्शक नमनसम्राट श्री.  यशवंत वाकडे, निर्माता श्री. साईनाथ नागवेकर, आभारचे अध्यक्ष श्री. विनोद हळदवणेकर, विशेष सहाय्य श्री. दादा वाडेकर, श्री. शरद गोळकपर, श्री. मदन डोर्लेकर, ( गुरूजी) श्री. वसंत घडशी सुत्रधार श्री. वासुदेव वाघे, श्री. सागर मायगडे हे सहाय्य करत असून या नमनातील गीते सौ.सर्वता चव्हाण यांनी लिहलेली असून मुख्य गायिका सौ. आकांक्षा वायंगणकर, सौ. सर्वता चव्हाण, सौ वेदा शेट्ये या गीते गात आहेत या कलाकारांना साथसंगत ढोलकी कु.पार्तेज आंबेरकर, बुलबुलतरंग श्री. परशुराम घवाळी ऑटोपॅड कु. साईश घवाळी करत आहेत.

यामध्ये कलाकार सौ. प्रेरणा विलणकर, श्रीमती ज्योती कदम, सौ रेश्मा शिंदे, सौ. पूनम गोळपकर, सौ. अर्चना मयेकर, श्रीमती रेखा खातू, सौ. विनया काळप, कु. मनस्वी साळवी, सौ. सर्वता चव्हाण, सौ. रिमा देसाई, सौ. गीता भागवत, कु. पूर्वा चव्हाण, सौ. समिक्षा वालम, सौ. आकाक्षा वायंगणकर, सौ. तन्वी नागवेकर, सौ. शीतल सकपाळ, कु. जुई पावसकर, कु. शोभना वरवटकर, कु. शमिका विलणकर, सौ, वेदा प्रकाश शेट्ये, श्रीमती माधवी पाटील, कु. स्वीटी पावसकर, कु. निधी वरवटकर या भूमिका करत आहेत तर नेपथ्य रचना श्री. बावा आग्रे ( लांजा) हे सांभाळत आहेत. तरी चिपळूण येथील हा महिलांनी सादर केलेला नमनाचा कार्यक्रम आवर्जून पहावा व या सर्व कलाकारांना प्रोत्साहन करावे असे रसिक श्रोत्यांना आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button