
मुंबई दि. ९:- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी विक्रांत भास्कर जाधव यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी विक्रांत भास्कर जाधव यांची नियुक्ती जाहीर करण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांकडून त्यांचे जोरदार अभिनंदन केले जात आहे.



